राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना कोरोनाची लागण

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी टेस्ट करून घ्यावी आणि काही लक्षणे असल्यास तातडीने उपचार घ्यावेत, अशा प्रकारचं ट्विट आमदार रोहित पवार यांनी केलं आहे. तसेच या संदर्भातील माहिती रोहित पवार यांनी स्वत: ट्विट करत दिली आहे.

तुमच्या सोबत त्याच्याशी लढत असताना गेली दोन वर्षे त्याला हुलकावणी देत होतो, पण अखेर त्याने मला गाठलंच. माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली. पण आपला आशीर्वाद असल्याने काळजीचं काही कारण नाही. माझ्या संपर्कात आलेल्यांनी टेस्ट करून घ्यावी आणि काही लक्षणे असल्यास तातडीने उपचार घ्यावेत, असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे.

राज्यातील अनेक राजकीय नेते आणि मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. रोहित पवार यांच्याआधी महाविकास आघाडीतील अजून एका आमदाराला कोरोनाची लागण झाली आहे. काँग्रेस आमदार धिरज देशमुख यांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यासंबंधातील माहिती त्यांनी ट्विटवरून दिली आहे.