धक्कादायक: राज्यात २४ तासांत ३६ हजार २६५ कोरोना रुग्णांची नोंद

3

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णसंख्ये झपाट्यानं वाढत असून गुरुवारी दिवसभरात तब्बल ३६ हजार २६५ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. या रुग्णवाढीसह राज्यातील सक्रिय रुग्णांचा आकडा आता १ लाख १४ हजार ८४७ इतका झाला आहे.

राज्यात गेल्या २४ तासांत ३६,२६५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर १३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. ८,९०७ रुग्णांनी आज कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. राज्यातील ओमायक्रॉनच्या रुग्णांचा आकडा देखील वाढताना दिसत आहे. राज्यात आज ७९ नवे ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. यासह ओमायक्रॉनच्या एकूण रुग्णांचा आकडा ८७६ इतका झाला आहे. तर बरं झालेल्या रुग्णांचा आकडा ३८१ इतका झाला आहे.

राज्यात सर्वाधिक रुग्णवाढ मुंबईत नोंदवली जात आहे. राज्यातील ३६ हजारांच्या रुग्णसंख्येत २०,१८१ रुग्ण तर एकट्या मुंबईतून आढळून आले आहेत. मुंबईत सध्या ७९,२६० सक्रिय रुग्ण आहेत. एका दिवसात मुंबईतील रुग्णसंख्येचा आकडा ५ हजारांनी वाढल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. मुंबईचा आजचा पॉझिटिव्हिटी दर तब्बल २९.९० टक्के इतका नोंदविण्यात आला आहे. मुंबईत बुधवारी तब्बल १५,१६६ नवे कोरोना रुग्ण आढलले होते. गुरुवारी हाच आकडा थेट २० हजारांच्यावर पोहोचला आहे. मुंबईतील धारावी परिसरातून आज १०७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर दादरमध्ये २२३ आणि माहिम परिसरातून ३०८ रुग्णांची वाढ झाली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.