राज्यात आज १२३३ नवीन रुग्णांचे निदान; एकूण रुग्ण १६ हजार  ७५८ – आरोग्यमंत्री राजेश टोपे

15 3,389

मुंबई, दि.६: राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १६ हजार ७५८ झाली आहे. आज  १२३३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज २७५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३०९४ रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ९० हजार ८७९  नमुन्यांपैकी १ लाख ७३ हजार ८३८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १६ हजार ७५८ जण पॉझिटिव्ह आले आहेत.

राज्यात २ लाख ११ हजार ११२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १३ हजार १०७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात ३४ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या ६५१ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी मुंबई मधील २५, पुण्यातील ३, अकोला शहरात ३, जळगाव शहरात १ तर सोलापूर शहरात १ मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशमधील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबईत झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी २१ पुरुष तर १३ महिला आहेत. आज झालेल्या ३४ मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १८ रुग्ण आहेत तर १३ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ३ जण ४० वर्षांखालील आहे. ३४ रुग्णांपैकी २७ जणांमध्ये (७९ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.