मंत्री अनिल परब यांना, उद्या पहाटे अटक होणार का? आमदार नितेश राणेंचा सवाल
महाराष्ट्रात अडकलेल्या नागरिकांसाठी एस.टी. बस सेवा सुरु होणार अशी चुकीची माहिती देणाऱ्या परिवहन मंत्री अनिल परब यांना उद्या पहाटे अटक होणार का? उद्या सकाळीची मी वाट पाहतोय.. असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे. जर पत्रकाराने चुकीची माहिती दिल्यामुळे गर्दी जमली म्हणून त्याला अटक होऊ शकते तर, आज एस.टी. डेपो बाहेर जी गर्दी चुकीची माहिती दिल्याने जमली त्यासाठी जवाबदार मंत्री अनिल परब यांना अटक झाली पाहिजे अशी भावना आमदार नितेश राणे यांनी ट्विट च्या माध्यमातून व्यक्त करत, सरकारला प्रश्न विचारला आहे.