महाराष्ट्रातील ३५००० पैकी १७००० कैद्यांची सुटका होणार

2

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यातील विविध तुरुंगातील तब्बल १७००० कैद्यांची काही काळासाठी पॅरोलवर सुटका करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्हिडीओ द्वारे दिली. आर्थर रोड कारागृहात १८५ आरोपींना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत, इतर तुरुंगात सोशल डीस्टनसिंगचे पालन व्हावे आणि इतर तुरुंगात असणाऱ्या आरोपींना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

Anil Deshmukh, Home Minister Maharashtra