टीईटी परीक्षा लांबणीवर, आता ‘या’ दिवशी होणार परीक्षा, MSEC चा मोठा निर्णय!

11

पुणे: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यावतीनं घेण्यात येणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महा टीईटी परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेचं आयोजन 10 ऑक्टोबरला करण्यात येणार होतं. मात्र, काही विद्यार्थ्यांच्या त्याच दिवशी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा असल्यानं राज्य सरकारच्या परवानगीनं टीईटी परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता टीईटी परीक्षा 31 ऑक्टोबरला  होणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं यासंदर्भात सुधारित वेळापत्रक जाहीर केलं आहे.

10 ऑक्टोबरला घेण्यात येणारी टीईटी परीक्षा लांबणीवर टाकली गेली आहे. आता 31 ऑक्टोबरला परीक्षा होणार असल्यानं प्रवेशपत्र देखील आता उशिरानं मिळणार आहेत. 14 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या दरम्यान प्रवेशपत्र मिळणार आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.

साधारपणे टीईटी परीक्षेचे दोन पेपर असतात. यामध्ये एक 1 ली ते 5 वी आणि 6 वी ते 8 वी इयत्तेतील शिक्षक भरतीसाठी ही परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली आहे. अशा दोन गटांसाठी ही परीक्षा घेण्यात येते. काही विद्यार्थी एका गटाची परीक्षा देतात तर काही विद्यार्थी दोन्ही गटांसाठीची परीक्षा देतात.

टीईटी परीक्षेचं वेळापत्रक

शिक्षक पात्रता परीक्षा पेपर – I दिनांक व वेळ 31/10/2021 वेळ स. 10:30 ते दु 13:00

शिक्षक पात्रता परीक्षा पेपर – II दिनांक व वेळ 31/10/2021 वेळ दु. 14:00 ते सायं. 16:30

पात्रता

टीईटीचा पेपर क्रमांक 1 देण्यासाठी दोन वर्षांचा शिक्षणशास्त्र विषयातील डिप्लोमा म्हणजेच डीएड उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्याशिवाय दुसऱ्या पेपरसाठी डी.एड उत्तीर्ण असणारे उमेदवार, पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक, शिक्षणशास्त्र विषयातील पदवी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.