भारतीय वारकरी मंडळ, पुणे तर्फे पुण्यनगरीत भव्य दिंडी सोहळा संपन्न; चंद्रकांत पाटील यांनी दिंडी सोहळ्यात वारकऱ्यांसोबत टाळ-मृदंगाच्या तालावर धरला ठेका

5

पुणे : भारतीय वारकरी मंडळ, पुणे तर्फे आज पुण्यनगरीत भव्य दिंडी सोहळा पार पडला. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील या दिंडीत सहभाग घेतला.

यावेळी विठ्ठल नामाच्या जयघोषात अखंड परिसर दुमदुमून गेला. या दिंडी सोहळ्यात चंद्रकांत पाटील यांनी वारकऱ्यांसोबत टाळ-मृदंगाच्या तालावर ठेका धरत, विठुरायाच्या गजरात दिंडी सोहळ्याचा आनंद लुटला. त्यांनी दिंडीतील पालखीचे दर्शन देखील घेतले.
यावेळी भाजपचे नेते हेमंत रासने, मंडल अध्यक्ष राजेंद्र काकडे, कोषाध्यक्ष अनिल बेलकर, वरिष्ठ उपाध्यक्ष निलेश कदम,युवा मोर्चा सरचिटणीस सिद्धेश पांडे उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.