महायुतीच्या अधिकृत उमेदवारांना पाठबळ देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेस उपस्थित रहावे, चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

3
पुणे : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दि. २९ एप्रिल २०२४ रोजी महायुतीच्या अधिकृत उमेदवारांना पाठबळ देण्यासाठी सोलापूर, सातारा आणि पुण्यात उपस्थित राहून जाहीर सभेद्वारे आपल्या प्रियजनांना संबोधित करणार आहेत. महायुतीच्या अधिकृत उमेदवारांना पाठबळ देण्यासाठी या जाहीर सभेस उपस्थित रहावे, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
ही निवडणूक राष्ट्रासाठी आहे, राष्ट्राच्या उज्जवल भवितव्यासाठी आहे. या विचाराला अनुसरून सोलापूर, सातारा आणि पुण्यातील तरुण, अबालवृद्ध, माता-भगिनी यांनी स्वयंस्फूर्तीने महायुतीच्या अधिकृत उमेदवारांना पाठबळ देण्यासाठी या जाहीर सभेस उपस्थित रहावे, असे चंद्रकांत पाटील यांनी आवाहन केले आहे.
मोदींच्या आजच्या सभा :-
दुपारी 1.45, होम ग्राउंड, सोलापूर
दुपारी ४.३०, कराड, सातारा
सायंकाळी ६.००, रेसकोर्स मैदान, पुणे

Get real time updates directly on you device, subscribe now.