पुण्याचे माजी खासदार अनिल शिरोळे यांच्या पत्नी सौ. माधुरी अनिल शिरोळे यांचे निधन… चंद्रकांत पाटील यांनी दुःख व्यक्त करत त्यांना केली श्रद्धांजली अर्पण

21

पुणे : पुण्याचे माजी खासदार अनिल शिरोळे यांच्या पत्नी तसेच  शिवाजीनगर मतदारसंघाचे विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या मातोश्री  सौ. माधुरी अनिल शिरोळे यांना दीर्घकालीन आजाराने आज सकाळी 10.17 वाजता देवाज्ञा झाली. त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकताच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दुःख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, पुण्याचे माजी खासदार अनिलराव शिरोळे यांच्या पत्नी आणि शिवाजीनगर मतदारसंघाचे विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या मातोश्री सौ. माधुरी वहिनी यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दु:ख झाले. सामाजिक जीवनात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला घरातून खंबीर साथ नेहमीच आवश्यक असते. अनिलराव आणि सिद्धार्थ यांना वहिनींनी ही साथ अतिशय समर्थपणे दिली. त्यामुळे अनिलराव आणि सिद्धार्थ दोघेही सार्वजनिक जीवनात काम करताना समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देत आहेत. मी वहिनींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, ही प्रार्थना. या कठीण काळात आम्ही सर्व शिरोळे कुटुंबाच्या दु:खात सोबत आहोत, असे पाटील यांनी म्हटले.
सौ. माधुरी अनिल शिरोळे यांच्या अंत्यदर्शनाची व्यवस्था राहत्या घरी दु .2.00 ते 4.00 पर्यंत असणार आहे . तसेच अंत्यविधी वैकुंठ स्मशानभुमी नवी पेठ,पुणे येथे दुपारी 4.30 वाजता, होणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.