राज्यात ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा इशारा

16

मुंबई: राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.` पुढील चार दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

राज्यात सध्या पावसाचा लपाछपीचा खेळ सुरूच आहे. कधी उन्हाळ्यासारखं कडक उन तर कधी तुफान पाऊस. कुठे अगदी कमी पाऊस तर कुठे पूरपरिस्थिती. पावसाने काही दिवस विश्रांती घेतली असतानाच आता पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.  ऑक्टोबरदरम्यान, समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असल्याची शक्यता असल्याने पावसाचा जोर वाढणार आहे. तशी शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसधार पावसाने थैमान घातले आहे. पावसामुळे शेतकऱ्यांची खरीप हंगामातील पिके पुर्णपणे पाण्यात गेली असून बळीराजाचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेली सोयाबिन पावसामुळे खराब झाल्याने बळीराज्याला अश्रू अनावर झाले आहे. दरम्यान अरबी समुद्र ते पश्चिम बंगालच्या उपसागरापर्यंत वादळी पावसाला पोषक स्थिती निर्माण होत आहे. 10 ऑक्टोबरला अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे राज्यात आणखी चार ते पाच दिवस पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटात पाऊस होण्याची शक्यता आहे.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.