रोहित शर्मावर प्रश्न विचारताच पाकिस्तानी पत्रकारांवर संतापला विराट

20

मुंबई: T20 विश्वचषकातील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताला लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. विश्वचषक सामन्यांमध्ये ही पहिलीच वेळ आहे की, जेव्हा पाकिस्तानकडून भारताला पराभव स्वीकारावा लागला आहे. सामना संपल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने पत्रकार परिषद घेतली तेव्हा त्याला काही असे प्रश्न विचारण्यात आले की, तो स्वत:च चकित झाला. जेव्हा एका पत्रकाराने टीम इंडियाच्या प्लेइंग-11 वर प्रश्न उपस्थित केला तेव्हा विराटचा एक वेगळाच अंदाज सगळ्यांना पाहायला मिळाला.

पत्रकार परिषदेत एका पाकिस्तानी पत्रकाराने विराट कोहलीला थेट विचारले की, टीम इंडियाच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत, रोहित शर्माच्या जागी इशान किशनला आणता आले असते का? तुम्ही पुढील सामन्यात रोहित शर्माला ड्रॉप करणार का? या प्रश्नावर विराट कोहली हा सुरुवातीला खूपच संतापलेला दिसला. तो काही वेळ त्या पत्रकाराकडे रोखूनच पाहत होता. नंतर तो पत्रकाराला असं म्हणाला की, ‘हा खूप धाडसी प्रश्न आहे.’

पत्रकाराने पुढचा प्रश्न विचारला की, पाकिस्तानी संघाने आज सर्वच स्तरातून चांगली खेळी केली ? ह्या प्रश्नावर विराट कोहलीने सावधरित्या आपली प्रतिक्रिया दिली “आमचा संघ सर्व संघाचा सम्मान करतो, हे खरं आहे की आज पाकिस्तानी संघाने आमच्यापेक्षा चांगली कामगिरी केली. कोणताच संघ १० गडी राखून सहजरित्या जिंकू शकत नाही, ह्या विजयाचे श्रेय पाकिस्तानी संघाला देणे गरजेचे आहे.

विराट कोहलीने पराभवाबद्दल आणखी स्पष्टीकरण देताना सांगितले “आम्ही त्यांच्यावर दबाव टाकण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांनी सर्वच स्तरातून आमच्यापेक्षा चांगली कामगिरी केली. आमच्यावर फलंदाजी करताना सुरूवातीपासूनच दबाव होता. आम्हाला या सामन्यात विजयच मिळेलच याचा आम्हाला विश्वास नव्हता. आम्ही आमच्या स्थितीनुसार चांगली धावसंख्या उभारली होती. तरीदेखील आम्हाला पराभूत व्हावे लागले, पाकिस्तानी संघाला या विजयाचे श्रेय द्यायलाच हवे. रोहितच्या प्रश्नावर बोलताना विराट म्हणाला की आम्ही सर्वोत्तम संघ मैदानात उतरवला होता.

Read Also :

Get real time updates directly on you device, subscribe now.