राज्य सरकाचा मोठा निर्यण: लोकल प्रवासाची नागरिकांना मुभा, ‘या’ नियमांचे करावे लागणार पालन

मुंबई: मुंबईची लाईफ लाईन समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेन बाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे केवळ लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांनाच लोकलने प्रवास करता येणार आहे. या आधी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना शासकीय व अत्यावश्यक ओळ्खपत्राच्या आधारावर लोकल पास आणि तिकीट वितरित केलं जात होतं. तर लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना केवळ मासिक पास दिला जात होता. पण यापुढे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, सामान्य नागरिक या प्रत्येकाला लशीचे दोन्ही डोस घेतलेले असतील तरच लोकल प्रवासाचा पास मिळणार आहे. लसीकरणाचा मोठा टप्पा पार केला असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार उपापययोजना करत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. यामुळे पुन्हा निर्बंध घालण्यात आले होते. दरम्यान कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे पुन्हा निर्बंध शिथिल करण्यात येत आहे. १५ ऑगस्ट २०२१ पासून केवळ दोन लसीचे डोस घेतलेल्या आणि २ लसीचे डोस घेऊन १४ दिवसाचा कालावधी पूर्ण झालेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिवाळीनंतर कोरोना लसीचा १ डोस घेतलेल्या नागरिकांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्यासाठी चाचपणी करणार असे वक्तव्य केले होते.
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या वक्तव्यानंतर आता राज्य सरकारने अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, तसेच ज्या सरकारी कर्मचाऱ्यांचे २ लसीचे डोस पूर्ण झाले आहेत. अशा कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची परवानगी दिली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी २ लसीचे डोस घेणे बंधनकारक आहे.
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मुभा देण्यात आली होती. परंतु आता या कर्मचाऱ्यांनाही लसीचे दोन डोस घेणं बंधनकारक आहे. वैद्यकीय कारणास्तव लस घेऊ न शकलेले आणि वृद्धांना लोकल प्रवासाला परवानगी देण्यात आली आहे. लोकल प्रवासासाठी युनिव्हर्सल पास असणे अनिवार्य आहे. सध्या राज्य सरकारने केवळ २ लसीचे डोस घेतलेल्या नागरिकांना मासिक पास काढण्याची परवानगी दिली असून टिकीट देण्यात येत नाही आहे.
Read Also :
-
महाराष्ट्र सरकार माझ्या पतीच्या विरोधात काम करत आहे; क्रांती रेडकरचा मोठा खुलासा
-
जनाब संजय राऊत, तुम्हाला मलिकांच्या नजरेतूनच हिंदूस्थान पाहायचाय; चित्रा वाघ यांचा…
-
2500 नागरिकांचे लसीकरण, आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार, लहू बालवडकर यांच्या महा…
-
आर्यन प्रकरणी 25 कोटींची तोडबाजी तर 3500 किलो हेरॉईन प्रकरणात कितीची तोडबाजी?
-
पुण्यातील हडपसर परिसरात बिबट्याची दहशत; नागरिकांना सतर्कता बाळगण्याचं आवाहन