जनाब संजय राऊत, तुम्हाला मलिकांच्या नजरेतूनच हिंदूस्थान पाहायचाय; चित्रा वाघ यांचा खोचक टोला

मुंबई: महाविकास आघाडीतील मंत्री नवाब मलिक  एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर वारंवार गंभीर आरोप करत आहे. सोमवारी त्यांनी वानखेडेंचा धर्म मुस्लिम असल्याचा खुलासा केला होता. मात्र, वानखेडेंनी ते आरोप फेटाळून लावले. तसेच शिवसेनेचे संजय राऊतांनी देखील समीर वानखेडे प्रकरणावरून टीका केली आहे. त्यावरूनच आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

”जनाब संजय राऊत तुम्हाला समीर वानखेडे हा अधिकारी बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी नसून मुसलमान आहे, हे सिद्ध करणाऱ्यांची पाठराखण करण्याची का एवढी घाई लागलेली आहे. अहमदनगरमध्ये ज्या हिंदूस्थानद्रोही लोकांनी पाकिस्तानच्या विजयाच्या घोषणा दिल्या. त्यांना विरोध करणाऱ्यांचे डोके फोडले जातात. तुमची यंत्रणा मात्र उलट विरोध करणाऱ्यांवर कारवाई करते. यावर तुम्हाला बोलायचं नाही. कारण जनाब राऊत तुम्हाला नवाब मलिकांच्या नजरेतूनच हिंदूस्थान पाहायचाय, असेही चित्रा वाघ म्हणाल्या. न्यायालयीन प्रकरणावर अशा गलीच्छ पद्धतीने दबाव आणण्याच्या प्रयत्नांचा मी धिक्कार करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

संजय राऊत नेमके काय म्हणाले?

नवाब मलिक हे कॅबिनेट मंत्री आहेत. ते बोलतात म्हणजे सरकार बोलत असते. सर्व पुरावे समोर आल्यानंतर राज्य सरकारने कायदेशीर करावी. तसेच ही कारवाई होतपर्यंत समीर वानखेडे यांना अधिकारीपदी राहण्याचा अधिकार नाही, असे संजय राऊत म्हणाले होते. त्यानंतर त्यांनी सामनामधून देखील भाजपवर टीका केली आहे.

Read Also :