नवाब मलिक यांचे डोके ठिकाणावर आहे का ते तपासण्याची गरज – प्रवीण दरेकर

मुंबई: मुंबई क्रूझ ड्रग्ज आणि आर्यन खान प्रकरणापासून नवाब मलिकांनी सुरू केलेलं समीर वानखेडेंवरच्या आरोपांचं सत्र आता वेगळंच वळण घेताना दिसत आहे. ड्रग्ज प्रकरणात भाजपाचाही सहभाग आहे, असा नवा आरोप आज नवाब मलिक यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस राज्यातल्या ड्रग्ज प्रकरणाचे मास्टर माईंड असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. त्यांच्या याच आरोपांवर आता भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नवाब मलिकांच्या डोक्यावर परिणाम झाला असल्याचंही ते म्हणाले आहेत.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर नवाब मलिक यांनी आरोप केले होते. त्यावर प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. नवाब मलिक यांचा चेहरा व देहबोली पाहिली तर ते वैफल्याने पूर्णपणे ग्रासलेले दिसत आहेत. म्हणूनच ते भाजप व भाजपच्या नेत्यांवर अशी बेताल वक्तव्य करत आहेत. अशाच प्रकारे त्यांनी अमृता फडणवीस मॅडम यांच्यावरही आज टीका टिप्पणी केली आहे. महिलांच्या संदर्भात व एखाद्याच्या कुटुंबियांवर टीका करताना त्यांची किळसवाणी प्रवृत्ती दिसून येते, अशी टीकाही त्यांनी केली.

संविधानाच्या चौकटीमध्ये एखादा मंत्री मंत्रिपदाची शपथ घेताना मी कोणाशी द्वेष भावनेने वागणार नाही, असूया करणार नाही. जातीपातीच्या संदर्भात माझी भूमिका न्याय्य असेल, अशी शपथपूर्वक सांगतो, ही संविधानाची चौकट आहे. पण या सगळ्या चौकटींचे उल्लंघन नवाब मलिक यांच्याकडून होत आहे. समीर वानखेडे मुस्लिम असल्याचे सिद्ध करण्याचा त्यांचा केविलवाणा अट्टहास सुरू आहे. ते दलित आहेत की मुस्लिम आहेत हे सिद्ध करण्याचा प्रकार आता पर्यंत कधीच झाला नव्हता. हे त्या पदाला शोभा दणारे नाही. त्यामुळे मलिक यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

Read Also :

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!