फडणवीसांचा ‘बॉम्ब’ फुसका, उद्या ‘हायड्रोजन बॉम्ब’ फोडणार – नवाब मलिक

15

मुंबई: ‘मुंबईत 1992 साली ज्यांनी मुंबईकरांच्या चिंधड्या उडवल्या त्यांच्यासोबत नवाब मलिक यांनी जमिनीचा व्यवहार केला आणि हा सगळा व्यवहार काळ्या पैशाचा आहे.’ असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (9 नोव्हेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. ज्याला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी उत्तर दिलं आहे.

यावेळी मलिक म्हणाले की, ‘फडणवीस हे मुख्यमंत्री असताना कशाप्रकारे अंडरवर्ल्डच्या मदतीने राज्याला वेठीस धरलं होतं. याचा हायड्रोजन बॉम्ब उद्या सकाळी 10 वाजता मुंबईवर फोडणार आहे.’ त्यामुळे आता नवाब मलिक हे फडणवीसांवर नेमका काय आरोप करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

फडणवीसांचे फटाके भिजले त्यामुळे आवाज आला नसेल. तुमच्यापूर्वी गोपीनाथ मुंडे होते. त्यांनीही काही मंत्र्यांचे संबंध दाऊदशी जोडले होते. पण माझ्या 62 वर्षाच्या जीवनात कुणीही अशा प्रकारचा आरोप लावू शकलं नव्हतं. आज त्यांनी एका जागेवरुन आरोप केलाय. मला वाटतं तुमचे जे माहितीगार आहेत. ते कच्चे खिलाडी आहेत. तुम्ही सांगितलं असतं तर अजून काही कागदपक्ष तुम्हाला दिली असती. आज मी बोलणार नाही. पण उद्या सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी अंडरवर्ल्डला हाताशी धरुन संपूर्ण शहराला कसं वेठीस धरलं हे उघड करणार, असा इशाराच मलिक यांनी केलाय.

Get real time updates directly on you device, subscribe now.