महाड हादरलं! महिला सरपंचाची हत्या, विवस्त्र अवस्थेत जंगलात आढळला मृतदेह

महाड: महाड तालुक्यातील एका गावच्या 42 वर्षीय सरपंच महिलेची निघृर्ण हत्या करुन तिचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत जंगलात टाकून दिल्याची अत्यंत खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात एकच भीतीचं वातावरण पसरलं आहे.

तुडील-भेलोशी रस्त्यालगत आदीस्ते गावच्या उबटआळी रस्त्यालगत सोमवारी दुपारी जंगलात सदर महिला लाकडं आणण्यासाठी गेली असता ही घटना घडली आहे. गावातील एक तरुण महाडकडे येत असताना रस्त्यालगत लाकडांची मोळी अस्त्यावस्त दिसून आली. पण आजूबाजूला कोणीही दिसलं नाही. त्यामुळे तरुणाला काहीसा संशय आला.

यामुळे सदर तरुणाने परिसरात आजूबाजूला पाहिल्यानंतर त्याला रस्त्यालगत जंगल भागात एक महिला गंभीर जखमी अवस्थेत दिसून आली. अज्ञात इसमाने डोक्यात लाकडी दांडक्याने प्रहार करुन तिची हत्या केली असल्याचं यावेळी उघड झालं. तसंच संबंधित महिलेचा मृतदेह विवस्त्र असल्याने तिच्यावर अतिप्रसंग अथवा बलात्कार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

महिलेचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत सापडल्यामुळे हत्येपूर्वी महिलेवर लैंगिक अत्याचार झाले असण्याची किंवा तसा प्रयत्न झाला असण्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात आहे. मात्र, या गोष्टीला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन नजीकच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!