मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग चौकशीसाठी मुंबईत दाखल

39

मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह गेल्या अनेक दिवसांपासून गायब होतो, मात्र परमबीर सिंह आज मुंबईत दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. कोर्टाने त्यांना फरार म्हणून घोषित केले होते. अशातच चंढिगडहून ते आज मुंबईत दाखल झाले आहेत. परमबीर सिंह आत्ता गृहरक्षक दलाच्या कार्यालयात जाण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यानंतर किल्ला न्यायालयात हजर होऊ शकतात. अशातच परमबीर सिंह गोरेगाव खंडणी प्रकरणात गुन्हे शाखा कक्ष ११ च्या गोरेगाव येथील कार्यालयात हजर झाले आहेत.

गोरेगाव खंडणी प्रकरणात परमबीर सिंह यांना फरार घोषित करण्यात आले होते. याप्रकरणात अनेकदा समन्स काढले होते. मात्र त्यानंतरही ते पोलिसांसमोर हजर झाले नाही. त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणात परमबीर सिंह यांच्यासह रियाझ भाटी आणि विनय सिंह यांनी फरार घोषित केले. फौजदारी गुन्हे दाखल असल्याने अटकेल्या भीतीने परमबीर सिंह बेपत्ता झाले होते.

अशातच सुप्रीम कोर्टाने सोमवारी अटकेपासून संरक्षण दिले, तसेच त्यांच्या याचिकेवर बाजू मांडण्याचे निर्देश महाराष्ट्र सरकार, पोलीस महासंचालक आणि केंद्रीय अन्वेषण विभाग यांना दिले आहे. यानंतर आज परमबीर सिंह मुंबईत दाखल झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, आपण तपासाला सहकार्य करु आणि आपल्याला जे सांगायचंय ते आपण कोर्टात सांगू असं परमबीर सिंह यांनी म्हटलं आहे.

या गोरेगाव खंडणी प्रकरणी राज्य सरकारने एसआयटीची स्थापना केली. या समितीने केलेल्या चौकशीत अनेक पुरावे आढळून आले होते. त्यानंतर पोलीस निरीक्षक आशा कोरके आणि नंदकुमार गोपाळे यांना अटक करण्यात आली आहे. या दोघांनी गुन्हा दाखल न करून घेण्यासाठी ५० लाख रुपये घेतले होते. अशी माहिती समोर आली आहे. या दोघांनी तक्रारदाराकडून खंडणी घेण्यासाठी हवालाचा वापर केला होता. यात परमबीर सिंह यांच्या सांगण्यावरुन आपण पैसे घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हवाला ॲापरेटर मोमिन याच्या माध्यमातून हे व्यवहार झाल्याचे म्हटले जाते.

Get real time updates directly on you device, subscribe now.