मला असं वाटतं की पुणेकरांची मराठी मुंबईकरांपेक्षा वीक आहे – चित्रा वाघ

पुणे: मला अस वाटतं पुणेकरांची मराठी मुंबईकरांपेक्षा वीक आहे”. असे वक्तव्य भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केलं आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्या नावाची घोषणा झाल्यावर शूर्पणखा बसवू नका असे वक्तव्य केलं होते. याबाबत चित्रा वाघ यांना पुन्हा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना चित्रा वाघ यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ काल पुणै दौऱ्यावर होत्या यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. चित्रा वाघ यांनी शूर्पणखा या विधानावर भूमिका मांडताना म्हटलं आहे की, शूर्पणखा म्हणजे कोणाचे नाव थोडीच आहे. मी फक्त उपमा दिली होती की रावणाला मदत करणारी शूर्पणखा नको. राज्यात रावण खूप फिरत आहेत. मी तुम्हाला तीन रावण दाखवले आहेत. असे अनेक रावण राज्यात आहेत त्यामुळे त्यांना मदत करणारी शूर्पणखा नको असे कोणा एका व्यक्तिला म्हणाले नाही असे चित्रा वाघ यांनी सांगितले आहे.

महाविकास आघाडी तीन पक्षाचे सरकार आहे त्यामुळे तुम्ही कोणालाही बसवा पण शूर्पणखेला बसवू नका. शू्र्पणखा काय तर रावणाला मदत करणारी शूर्पणखा हे मला माहिती आहे. बहीण जरी असेल आणि चुकिचा कामात जर मदत करत असेल तर ते आम्हाला कसे चालेल असे चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. जर पुण्यात कोण शूर्पणखा असेल तर आम्हाला कळवा असेही चित्रा वाघ यांनी यावेळी म्हटले होते.