राज्यात मुख्यमंत्रिपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला? संजय राऊतांचं मोठं विधान, म्हणाले..

20

मुंबई: 2019 च्या विधानसभेच्या निकालानंतर भुतो ना भविष्य असं गणित लागून तीन पक्ष एकत्र येत राज्यात महाविकासआघाडीचं सरकार आलं. तेव्हापासून सरकारचे नेतृत्व उद्धव ठाकरे करतील, आणि सरकार पाच वर्ष टिकेल असं वारंवार सत्तेतील नेत्यांकडून सांगण्यात येत असते.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीच्या समस्या निर्माण झाल्यापासून अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्यानुसार राज्याचा मुख्यमंत्री बदलणार असल्याची चर्चा सुरू झाली होती या चर्चांवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.

एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी बोलताना मुख्यमंत्री पदाविषयी सुरू झालेल्या चर्चांना आपल्या बाजुने पूर्णविराम दिला. महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्त त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला ही मुलाखत दिली. यात राऊतांना प्रश्न विचारण्यात आला की अडीच वर्षानंतर मुख्यमंत्री बदलणार का, यावर उत्तर देताना राऊत म्हणाले की, याविषयी कोण पुड्ाय सोडत मला माहिती नाही. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले तेव्हाच्या प्रक्रियेमधील मी एक साक्षीदार आहे. तसेच एक क्रियाशील कार्यकर्ताही होतो. कुणाच्या डोक्यात कल्पना नव्हती.

तेव्हा निकाल सुरू असताना मी शरद पवारांकडे जाऊन असं होऊ शकतो असं सांगितलं. तेव्हा काय चर्चा झाल्या हे मला माहिती आहे. तेव्हा शरद पवार यांनी राज्याचे नेतृत्त्व उद्धव ठाकरे पूर्ण वेळ करणार असं स्पष् केलं होतं. या सरकारचा कालखंड पाच वर्षाची आहेत त्याच्या मनात शंका नाही, तसेच कुणीही किती खेचाखेची केली तरी सरकार पडणार नाही. जास्त आमदार म्हणून  २०१९ मध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला. आता २०२४ मध्ये हेच सूत्र कायम राहणार का असा प्रश्न केला असता संजय राऊत यांनी ती शक्यता फेटाळून लावली. ते म्हणाले काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीमध्ये एकवेळ अशी आली होती.

Get real time updates directly on you device, subscribe now.