लॉकडाऊन नको असेल तर आरोग्याची बंधने पाळावीच लागतील – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

27

मुंबई: दक्षिण आफ्रिकेत ‘ओमिक्रॉन’ करोनाचा नवीन विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे. च्या विषाणूचा अधिक वेगानं प्रसार होत असून तो अधिक धोकादायक असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत रविवार (दि.२८) रोजी टास्क फोर्सची बैठक घेण्यात आली बैठकीत महत्वपूर्ण अशा उपाययोजनांवर चर्चा झाली.

या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी करोनाच्या धोकादायक नव्या विषाणूला रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करा, विमान तळावर येणाऱ्या सर्व प्रवाशांकडे काटेकोर लक्ष द्या अशा सूचना प्रशासनला दिल्या आहेत. तसंच पुन्हा एकदा लॉकडाऊन नको असेल तर आरोग्याची बंधनं पाळावी लागतील, असं इशारावजा आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं आहे.केंद्राच्या सूचनांची वाट न पाहता तातडीने कामाला लागा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत. दरम्यान, ओमिक्रॉन च्या संदर्भात मुख्यमंत्र्यानी उद्या तातडीने मंत्री मंडळ बैठक ही बोलावली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्र सरकारने शनिवारला कोरोनाव्हायरसच्या नवीन ओमिक्रॉन प्रकाराच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन बैठक बोलावली होती. केंद्र सरकारच्या आरोग्य सचिवांनी सर्व राज्यांना नवीन गिल्डलाइन्स आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांबाबत घ्यावयाची खबरदारी असलेले पत्र जारी केले आहे.

आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर, विशेषतः ‘हाय रिस्क’ देशांतील प्रवाशांवर कठोर पाळत ठेवणे, नियमित तपासणी, कोविड चाचणी, त्यांच्या मागील प्रवासाच्या नोंदी आणि त्यांचे नमुने त्वरित जीनो सिक्वेन्सिंगसाठी पाठवणे, अशा सुचना सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मुख्य सचिवांना दिल्या गेल्या आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.