मुंबई पाठोपाठ पुणे महापालिकेचा मोठा निर्णय; शाळा डिसेंबरच्या ‘या’ तारखेपासून होणार सुरु

7

पुणे: मुंबई पाठोपाठ पुणे महापालिकेनं शाळा 15 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्याचे महापौर मुरलधीधर मोहोळ यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. पुण्याचे महापौर आणि महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. ओमिक्रॉन विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात तीन दिवसांसाठी निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. त्यामुळं पुणे महापालिकेनं शाळा 15 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारकडून पहिली ते चौथीच्या शाळा उद्यापासून सुरु करण्याची घोषणा करण्यात आली असली तरी पालक संघटना आणि शिक्षण संस्था यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, असं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे शाळा सुरु करण्याबाबत प्रशासनात संभ्रम असल्याचं चित्र दिसून आलं होतं. अखेर पुणे महापालिका आयुक्त आणि महापौर यांच्यात चर्चा झाल्यानंतर पहिली ते सातवीच्या शाळा 15 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शाळांची तयारी पूर्ण मात्र पालिकेचा सावध पवित्रा

पुण्यातील शाळांनी पहिलीपासूनचे वर्ग सुरु करण्यासाठीची तयारी पूर्ण केलीय. तर, दुसरीकडे शाळा सुरु करावी अशी पालकांची भूमिका आहे. मात्र, पुणे महापालिकेनं ओमिक्रॉन वेरिएंटच्या पार्श्वभूमीवर सावध पवित्रा घेत शाळा 15 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.