ठाकरे सरकारकडून नवी नियमावली; आजपासून लागू असतील ‘हे’ नवे निर्बंध

7

मुंबई: ओमिक्रॉनच्या वाढता प्रादुर्भावामुळे रुग्णसंख्या राज्यात पुन्हा आजपासून नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल टास्क फोर्सची बैठक घेऊन हा निर्णय घेतला, हा नाईट कर्फ्यू रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत लावण्यात येईल.

कोव्हिड संसर्ग थोपवण्यासाठी कशाप्रकारे निर्बंध लावता येतील यासाठी टास्क फोर्सची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. टास्क फोर्समधील तज्ञांची मते जाणून घेऊन मुख्यमंत्र्यानी मार्गदर्शन केले. सणासुदीच्या महिन्यात सार्वजनिक परिसरात कशाप्रकारे सार्वजनिक आरोग्याची कशी काळजी घेतली जाईल याची प्रशासनाकडून काय उपाययोजना केल्या आहेत याचा आढावा घेतला.

येऊ घातलेल्या ख्रिसमस तसेच नवीन वर्षाच्या पार्श्वभुमीवर कोव्हीड तसेच ओमिक्रॉनला अटकळ घालण्यासाठी नवीन नियमावलीवर विस्तृत चर्चा करण्यात येऊन याबाबत आज २४ रोजी नवी नियमावली जाहीर करण्यात आले. विवाह समारंभ, पार्ट्या यामुळे होणारी गर्दी, तसेच होटेल्स व उपहारगृहात होणाऱ्या गर्दीवर कसे निर्बंध घालता येईल याची नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

मध्य प्रदेश सरकारनेसुद्धा गुरुवार रात्रीपासूनच नाइट कर्फ्यूची घोषण केली आहे. त्यानंतर महाराष्ट्रातसुद्धा कर्फ्युचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी दिले होते. गुरुवारी देशातील एकुण १६ राज्यांमध्ये ओमायक्रॉन रुग्णांची संख्या ३२५ वर पोहोचली. तामिळनाडूत सर्वाधिक ३३ रुग्ण आढळले. त्याचदिवशी महाराष्ट्रातील रुग्णसंख्या २३ वरून ८८ वर पोहोचली आहे.

अफ्रिकन किंवा कोव्हीडग्रस्त देशांमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी हे निर्बंध असतील. दक्षिण आफ्रिका, बोटस्वाना आणि झिम्बाम्वे हे देश यामध्ये आहेत. तसेच या देशांमधून गेल्या १५ दिवसात प्रवास केलेले, या देशांमधून भारतात तसंच राज्यात परतलेले प्रवासी यांना हे नियम लागू आहे.

१. या देशातून येणाऱ्या प्रवाशांना RTPCR चाचणी बंधनकारक, ती पॉझिटिव्ह आल्यास उपचारासाठी कोविड रुग्णालयात दाखल करण्यात येईल.

२. या चाचणीनंतर ७ दिवस संस्थात्मक विलगीकरणात राहावं लागणार.

३. या ७ दिवसांनंतर पुन्हा चाचणी केली जाईल. ती निगेटिव्ह आल्यास पुढील सात दिवस गृहविलगीकरणात राहावं लागणार.

४. इतर राज्यांमधून येणाऱ्यांना लसीचे दोन्ही डोस अनिवार्य

५ . लस घेतली नसेल तर ७२ तासांतला निगेटिव्ह RTPCR चाचणी अहवाल

Get real time updates directly on you device, subscribe now.