बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट अडचणीत! गुन्हा दाखल करण्याचे महापालिकेचे आदेश

5

मुंबई: कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनने ब्रिटनमध्ये थैमान घातलं आहे. त्यापाठोपाठ अमेरिका  आणि भारतात  देखील ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशात ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या 73 वर पोहोचली आहे. धक्कादायक म्हणजे एकट्या महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे सर्वाधिक 34 रुग्ण आहेत. अशाच बॉलिवूडमधील कलाकारांकडून कोरोनाच्या नियमांचे उल्लघंन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेत्री आलिया भट्ट हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई महापालिकेकडून  संबंधित अधिकाऱ्याला देण्यात आले आहेत.

आलिया भट्ट सिनेनिर्माता करण जोहर याने मुंबईत आयोजित केलेल्या पार्टीत सहभागी झाली होती. दरम्यान याच पार्टीतील अभिनेत्री करिना कपूर-खान, अमृता अरोरा, करिष्मा कपूरसह चार जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने आलिया भट्टला देखील 7 दिवस होमक्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र, आलिया ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या कामासाठी दिल्लीला गेली. इतकंच नाही तर आलियाने दिल्लीतील एका गुरुद्वारला भेट देखील दिली. त्यामुळे होम क्वारंटाईनच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे आलिया भट्ट विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुंबई महापालिकेच्या आरोग्य समितीच्या अध्यक्ष राजुल पटेल यांनी आलिया भट्टविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. आलिया भट्ट हिने कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. आलिया ही एक जबाबदार नागरिक असून तिने गांभिर्याने घ्यावे, असा सल्ला देखील तिला देण्यात आला आहे. दरम्यान, आपण एक दिवसासाठी दिल्लीला आहे. आपला कोविड रिपोर्ट निगेटिव्ह आला असल्याचं देखील आलियाने महापालिकेला आधीच कळवलं होतं अशी माहिती देखील समोर आली आहे.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.