केंद्र सरकारने महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशभरातल्या ओबीसींचं मोठं नुकसान केलंय – जयंत पाटील

डोंबिवली: ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपने महाविकास आघाडीला घेरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ओबीसी आरक्षण टिकवण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याची टीका ही भाजप नेत्यांकडून केली जाते. याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर पलटवार केला. केंद्र सरकारने महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशभरातल्या ओबीसींचा मोठे नुकसान केलंय. ओबीसींचा पुन्हा सर्व्हे करण्याची पाळी आता केंद्र सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे आलीये. ओबीसी आरक्षण मिळवण्यासाठी राज्य सरकार कुठे कमी पडणार नाही मात्र मुद्दामून खोडा घालण्यासाठी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात अशी भूमिका घेतली आहे.

फक्त महाराष्ट्रातच नाही तर मध्यप्रदेशात देखील ओबीसींचं आरक्षण गेलं आहे. उद्या कर्नाटक आणि यूपीमध्ये देखील हीच गोष्ट होणार आहे. त्यामुळे भाजपने ओबीसींच्या विरोधी घेतलेली भूमिका ही अनाकलनीय असल्याची टीका केली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यानी काल डोंबिवलीत राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने आयोजित शरद महोत्सवाला भेट देण्यासाठी आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील यांनी भाजपवर टीका केली.

ओबीसी आरक्षणाबाबतचा इम्पॅरिकल डेटा केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात देणे अपेक्षित होतं. दुर्दैवाने लोकसभेमध्ये जे उत्तर केंद्र सरकारने दिलं आहे त्यात इमपरिकल डेटा जवळपास 98 टक्के बरोबर असल्याचं विधान केले होतं आणि त्यानंतर केंद्र सरकारने हा डेटा कोर्टात देताना त्यात बऱ्याच त्रुटी आहेत असं विरोधी विधान केलं आणि आता म्हणतात की डेटा उपलब्ध नाही या सगळ्या भूलथापा केंद्र सरकारच्या भाजपच्या आहेत, असे जयंत पाटील म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!