आदित्य ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला बंगळुरुमधून अटक

12

मुंबई: पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला बंगळुरुमधून अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडून धमकी देणाऱ्या जयसिंग राजपूतला अटक करण्यात आली. हा आरोपी 34 वर्षांचा असून मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडून अटक करण्यात आली आहे.

राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या 34 वर्षीय आरोपीला पश्चिम प्रादेशिक सायबर पोलिसांनी बंगळूरु येथून अटक केली आहे. आदित्य ठाकरे यांना त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर आरोपीने संदेश पाठवून धमकी दिली होती. आरोपीने व्हॉट्सअ‍ॅप संदेशात अभिनेता सुशांर्तंसह राजपूतच्या मृत्यूबाबत ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत.

बंगळुरुहून अटक करण्यात आलेला आरोपी जयसिंग राजपूत याने 8 डिसेंबरच्या मध्यरात्री 12 च्या सुमारास सर्वप्रथम आदित्य ठाकरे यांना व्हॉट्सअ‍ॅपवर संदेश पाठवला होता. त्या मेसेजमध्ये त्याने सुशांत सिंहच्या मृत्यूबाबत आरोप केले होते. त्यानंतर त्याने तीन फोनही  केले. आदित्य ठाकरेंनी ते फोन उचलले होते. त्यानंतर संतापलेल्या आरोपीने आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी दिली होता. तसा मेसेज त्यानं आदित्य ठाकरेंना पाठवला होता. याप्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावतीने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, 34 वर्षीय आरोपी जयसिंग राजपूतला मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडून अटक करण्यात आली आहे. सायबर पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने तपास केला. त्यावेळी आरोपी बंगळूरु येथे असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार बंगळूरु येथून राजपूत याला अटक  करण्यात आली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.