अमृता फडणवीस यांनी केला एका डिझायनर विरोधात गुन्हा दाखल… १ कोटींची लाच देण्याचा प्रयत्न

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी  अमृता फडणवीस यांनी एका डिझायरविरोधात तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. अनिक्षा नावाची डिझायनर आणीन तिच्या वडिलांविरोधात अमृता यांनी मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली आहे. अमृता फडणवीस यांनी या तक्रारीत म्हटले आहे कि, १ कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला असल्याचे म्हटले आहे.

मुंबईच्या मलबार हिल पोलीस ठाण्यात अमृता यांनी २० फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी अनिक्षा आणि तिच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कलम १२०, भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा १९८८ कलम ८ आणि १२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे कि, अनिक्षाची ओळख झाल्यापासून तिने सांगितले कि, ती कपडे, दागिन्यांची डिझायनर आहे. तिने डिझाईन केलेले कपडे आणि दागिने सार्वजनिक कार्यक्रमात घालावे . त्यानंतर सागर बांगला आणि विविध कार्यक्रमात तिची भेट होत होती. २७ जानेवारी २०२३ रोजी पुण्यातल्या एका कार्यक्रमात पुन्हा भेटली.  त्यावेळी अमृता यांनी तिला कार मध्ये बसवलं . तेव्हा तिने म्हटले कि, तिचे वडील पोलिसांना बुकिंगबाबत माहिती देत होते. त्यानुसार पोलिसांनी सट्टेबाजांवर कारवाईच्या सूचना देऊन पैसे कमवू शकतो. कारवाई न करण्यासाठी सट्टेबाजांकडून पैसे घेऊ शकतो, हे ऐकून अमृता यांनी तिला कारमधुन उतरवलं.

अमृता यांनी पुढे सांगितले कि, १६ फेब्रुवारीला रात्री ९. ३० च्या दरम्यान अनिक्षाने फोन  केला. ती तेव्हा म्हणाली कि, तिच्या वडिलांना एका प्रकरणात आरोप करण्यात आला आहे. त्यातून त्यानं बाहेर काढण्यासाठी एक कोटी रुपये देण्याची तयारी आहे. हे ऐकून अमृता यांनी तिचा फोटो कट केला आणि तिचा नंबर ब्लॉक केला. आणि त्यानंतर त्यांनी तिच्याविरोधात तक्रार दाखल केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!