लोकशाहीचे रक्षक असाल तर अधिवेशनाचा कालावधी एक आठवड्याने वाढवा – सुधीर मुनगंटीवार

मुंबई: अधिवेशनाचा कालावधी कमीत कमी एक आठवडा वाढवला पाहिजे. कारण आमच्याकडे भरपूर कामकाज आहे. या सभागृहाला योग्य आणि समर्पक न्याय द्यायचा असेल तर एक आठवडा हे अधिवेशन वाढवलंच पाहिजे, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरही त्यांनी भाष्य केलं. आज त्यांनी त्यांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. आम्ही विरोधी पक्ष बसणार आहोत. त्यावर आमचा पुढील निर्णय घेणार आहोत, असं त्यांनी सांगितलं.असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

सुधीर मुनगंटीवार यांनी मीडियाशी संवाद साधताना म्हणाले की, राज्यातील हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. राज्याचं अर्थचक्र थांबलंय आणि कोमात सुद्धा गेलं आहे. राज्यामध्ये अनेक रोजंदारी कामगारांचे पैसे दिलेले नाहीयेत. धानाचा बोनस दिलेला नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न उर्वरीत आहेत. कोरोनाच्या कालावधीत झालेला भ्रष्टाचार, आरोग्य सेवेसह मंत्रालय भ्रष्टाचाराचा अड्डा झाला आहे. तर मंत्रालयात दारूच्या बाटल्या सापडत आहेत. इतके विषय शेतकरी, कामगार, बेरोजगारी, कष्टकरी, विद्यार्थ्यी बेरोजगार पेपर फुटीसारखं घाणेरडं कृत्य आणि पाप या राज्यामध्ये होत आहे. त्यामुळे तरूण आणि तरूणांच्या मनामध्ये प्रचंड प्रमाणात आक्रोश आहे, असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विधिमंडळाबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, या सर्वांचं शंकांचं निरसण करण्यासाठी फक्त एकच जागा आहे ती फक्त विधानसभा आहे. या विधानभवनामध्ये योग्य कार्य करायचे असतात. जनतेच्या समस्या विधानभवनात घेऊन त्यांच्या प्रश्नांची उत्तरं शोधायची असतात. राज्य कर्ते आणि राज्य सरकारने ओबीसी, वंचित, पीडित , जाती-जमाती आणि इतर लोकांना सुद्धा न्याय द्यायला पाहीजे आणि योग्य न्याय दिला पाहीजे. हे लोकशाहीचे खरे रक्षक असतील तर लोकशाहीचं अधिवेशन वाढवतील. जर लोकशाहीचे भक्षक असतील तर ते अधिवेशन वाढवणार नाहीत. असं मुनगंटीवार म्हणाले.