महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांना कोरोनाची लागण
अमरावती: महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी स्वत: माहिती दिली असून त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन श्रीमती ठाकूर यांनी केले आहे.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नसली तरी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरु आहेत. कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे. यासाठी नागरिकांनी कोरोना नियमावलींचे काटेकोरपणे पालन करीत नववर्षाचे स्वागत, सण, उत्सव, लग्न समारंभ आदी कार्यक्रम साधेपणाने व कमीत-कमी नागरिकांच्या उपस्थितीत साजरे करावे, असे त्या यावेळी म्हणाल्या.
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे.
मला कोणतेही लक्षणे नाही, तरीही डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे.
माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. सगळ्यांना या निमित्ताने आवाहन करत आहे, आपण मास्क वापरावा, काळजी घ्यावी.— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) December 31, 2021
मास्क लावणे, वारंवार हात धुणे, सॅनिटाईजरचा वापर तसेच सामाजिक अंतर राखणे या कोविड त्रिसुत्रीचे पालन सर्वांनी करावे, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.