केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंना कोरोनाची लागण

1

जालना: एकोपाठ एक मंत्र्यांसह खासदार व आमदार कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी आज शनिवारी सोशल मीडियावरुन माहिती दिली आहे. दानवे आपल्यामध्ये ट्विट म्हणतात, की कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने माझी कोरोना टेस्ट केली असता टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. पुढील काही दिवस डॉक्टरांच्या सल्ल्याने मी आयसोलेशनमध्ये आहे. याची सर्व कार्यकर्त्यांनी नोंद घ्यावी. त्याच प्रमाणे माझ्या संपर्कात असलेल्यांनी स्वतःची तात्काळ टेस्ट करावी व काळजी घ्यावी.

कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने,माझी कोरोना टेस्ट केली असता टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. पुढील काही दिवस डॉक्टरांच्या सल्ल्याने मी आयसोलेशन मध्ये आहे, याची सर्व कार्यकर्त्यांनी नोंद घ्यावी, त्याच प्रमाणे माझ्या संपर्कात असलेल्यांनी स्वतःची तात्काळ टेस्ट करावी व काळजी घ्यावी.

शुक्रवारी दानवे हे मुंबईहून जालन्याला रेल्वेने आले होते. राज्यातील अनेक राजकीय नेते सध्या कोरोनाबाधित झाले आहेत. यात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार सुप्रिया सुळे, आमदार अतुल भातखळकर, रोहित पवार, धीरज देशमुख यासह अनेकांचा समावेश आहे.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.