ईडीला ज्या बातम्या कळत नाहीत त्या सोमय्यांना आधी कळतात, रोहित पवारांची खरमरीत टीका

कर्जत: राज्यात नगर पंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. कर्जत नगर पंचायत निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजपच्या लोकांनी किरीट सोमय्या यांना जे काम दिलं आहे. ते काम ते योग्य पद्धतीने करताहेत. कारण ईडीला ज्या बातम्या कळत नाहीत त्या सोमय्यांना आधी कळतात, अशी खरमरीत टीका रोहित पवारांनी केली आहे. तसेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजपच्या लोकांनी किरीट सोमय्यांना जे काम दिलं आहे. ते योग्य पद्धतीनं करत आहेत. ईडीला ज्या बातम्या कळत नाहीत त्या सोमय्यांना आधी कळतात. ते जसे भाजपचे प्रवक्ते आहेत तसेच ईडीचेही प्रवक्ते आहेत. सोमय्या हे राजकारण करत आहेत हे सर्वांनाच कळतं. अशी खोचक टीका रोहित पवार यांनी केली आहे.

राज्यात नगर पंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. कर्जत नगर पंचायत निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजपच्या लोकांनी किरीट सोमय्या यांना जे काम दिलं आहे. ते काम ते योग्य पद्धतीने करताहेत. कारण ईडीला ज्या बातम्या कळत नाहीत त्या सोमय्यांना आधी कळतात, अशी खरमरीत टीका रोहित पवारांनी केली आहे. तसेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.