तुफान उसळणार,आवाज घुमणार…दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कवर परवानगी मिळताच शिवसेनेचे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल
मुंबई: शिवसेनाला अखेर शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानी मिळाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने याबाबत निकाल देताच शिवसेना नेत्यांकडून यावर प्रतिक्रिया येते आहेत. तसेच शिवसेना प्रमुख यांनी सुद्धा यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. मात्र परवानगी मिळताच काही वेळातच सोशल मिडियावर शिवसेनेकडून एक पोस्टर व्हायरल होत आहे.
शिवसेनेकडून दसरा मेळाव्याला परवानगी मिळ्यानंतर सोशल मिडीयावर सध्या एक पोस्ट व्हायरल झाले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, तुफान उसळणार आवाज घुमणार अशा शब्दाचे पोस्टर सध्या सोशल मिडीयावर आहे. तसेच उद्धव ठाकरे म्हणाले की, दसरा मेळाव्यासाठीकार्यकर्त्यांनी वाजत गाजत यावे परंतू आपल्या या परंपरेला गालबोट लागेल असे वागू नये, असे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले आहे.
तसेच निवडणुका जवळ आहेत. पालिका निवडणुक जिंकायची आहे. त्यावर शिवसेनेचा भगवा फडकावयचा आहे. त्यामुळे गटतट पाडू नका, रुसवे-फुगवे नको. उमेदवारी फार मोजक्या लोकांना देता येते. पण आपल्यासाठी भगवा झेंडा हाच आपला उमेदवार आहे. त्यामुळे तयारीला लागा, असे आवाहनही त्यांनी शिवसेना कार्यकर्त्यांना केले.
सर्वोच्च न्यायालयातील खटल्यांवरील सुनावणीबाबत उद्धव ठाकरे म्हणाले की,सर्वोच्च न्यायालय शिवसेनेच्या वादावर जो निकाल देईल तो देशाच्या लोकशाहीचे भविष्य ठरविणारा निकाल असेल. आम्ही न्यायदेवतेवर संशय घेतलेला नाही. आजचा हा लोकशाहीच्या विजयाचा दिवस आहे. न्यायदेवतेवरचा विश्वास सार्थ ठरला, असे ठाकरे म्हणाले.