महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाकडून जोरदार युक्तिवाद … उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर केले प्रश्न उपस्थितीत

6

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. आज सुनावणीचा दुसरा दिवस. काल म्हणजे मंगळवारी  ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला होता. त्यानंतर आज शिंदे गटाच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला. शिंदे गटाकडून नबाम रेबिया प्रकरणांचा निकाल ग्राह्य धरून निर्णय घ्यावा अशी मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे करण्यात आला.

सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाच्या वतीने वरिष्ठ वकील हरीश साळवे यांनी युक्तिवाद केला. यावेळी त्यांनी म्हटले कि, राज्यातील सरकार कोसळण्याला उद्धव ठाकरे जबाबदार आहेत. उद्धव ठाकरेंनी बहुमत चाचणीपूर्वीच राजीनामा दिला. राज्यपालांनी त्यांना बहुमत चाचणीसाठी बोलावलं होत. २८ जून रोजी हि बहुमत चाचणी होणार होती. परंतु त्यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिला.  त्यामुळे हे सरकार कोसळण्याला उद्धव ठाकरे जबाबदार आहेत. असे हरीश साळवे यांच्याकडून करण्यात आला आहे.

हरीश साळवे यांनी पुढे म्हटले कि, पक्षांतर बंदी कायद्यामुळे देशात पक्षांतर थांबलेले नाही. पक्षाचा विश्वास गमावलेल्या नेत्यासाठी पक्षांतर विरोधी कायदा लागू होत नाही. राजकीय नैतिकतेचे अनेक पैलू आहेत. हा केवळ चर्चात्मक मुद्दा नाही, असेही साळवे यांनी म्हटले. रेबिया प्रकरणांचा हवाला चुकीचा असेल तर विरोधकांना त्यांची याचिका मागे घ्यावी लागेल, असे साळवे यांनी म्हटले.

Get real time updates directly on you device, subscribe now.