कसब्यातील भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी क्रिकेट खेळाचा आनंद लुटला… मैदानावर केली चौफेर फटकेबाजी

कसब्यातील भाजपचे उमेदवार हेमंत रासने हे आपल्या साध्या राहणीमानासाठी ओळखले जातात. गणेश मंडळाचे कार्यकर्ते अशी त्यांची ओळख असून त्यांचे क्रिकेटबद्दलचे प्रेम देखील सर्वश्रुत आहे. याच प्रेमाचा प्रत्यय नुकताच आला आहे. आज प्रचाराच्या निमित्ताने मैदानावर फेरफटका मारत असताना काही क्रिकेट खेळत असणाऱ्या तरुणांनी रासने यांच्याकडे क्रिकेट खेळण्याचा आग्रह धरताच रासने यांच्यातील क्रिकेटपटू जागा झाला आणि मग फलंदाजीसाठी उतरलेल्या रासने यांनी चौफेर फटकेबाजी त्यांनी केली.

याबाबत त्यांनी स्वतः ट्वीट करत माहिती दिली आहे. यात ते म्हणतात, क्रिकेट आणि माझा अगदी लहानपणापासूनचा संबंध. पण राजकीय आणि सामाजिक जीवनात व्यस्त झाल्यानंतर क्रिकेटपासून दुरावलो. आज मात्र प्रचाराच्या निमित्ताने मैदानावर फेरफटका मारत असताना क्रिकेट खेळण्याचा आग्रह झाला. हा आग्रह माझ्यातला क्रिकेटप्रेमी टाळू शकला नाही. दरम्यान, कसबा पोटनिवडणुकीत धंगेकर-रासने असा सामना होत असून आता हा सामना कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.