हे भाकरी मातोश्रीची खातात आणि चाकरी राष्ट्रवादी आणि शरद पवारांची करतात, दादा भुसे यांचे संजय राऊतांवर टीकास्त्र

खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटातील मंत्री दादा भुसे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. मंत्री दादा भुसे यांनी कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी केलेल्या या आरोपावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागली आहे. याविषयी आज विधानसभेत दादा भुसे यांनी राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. आहे.

दादा भुसे यांनी सभागृहात म्हटले कि, आम्हाला वारंवार गद्दार म्हणणारे आणि आमच्याच मतांवर राज्यसभेवर निवडून गेलेल्या संजय राऊतांनी काल एक ट्विट केले. जगाच्या पाठीवर असलेल्या कोणत्याही यंत्रणेच्या माध्यमातून या ट्विटची चौकशी करण्यात यावी, असे भुसे यांनी म्हटले.
त्या चौकशीत मी दोषी आढळलॊ तर आमदारकी आणि मंत्रिपदाचा राजीनामा देत राजकारणातून निवृत्त होईल. जर खोटे आढळून आले तर या महागद्दारांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा द्यावा, असे आव्हान भुसे यांनी केले.
दादा भुसे यांनी पुढे असे म्हटले कि, हे भाकरी मातोश्रीची खातात आणि चाकरी राष्ट्रवादी आणि शरद पवारांची करतात. संजय राऊतांनी मालेगावच्या नागरिकांची आणि महाराष्ट्राची माफी मागावी. २६ मार्चपर्यंत माफी मागितली नाही, तर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचे शिवसैनिक त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असेही भुसे यांनी म्हटले.
संजय राऊत यांनी आपल्या ट्विट मध्ये नेमक काय म्हटले ?
हे आहेत मंत्री दादा भुसे. शेतकरी त्यांच्या विरोधात रस्त्यावर आले आहेत.गिरणा अग्रो नावाने178 कोटी 25 लाखांचे शेर्स शेतकऱ्याकडून गोळा केले.पण कंपनीच्या वेबसाईटवर केवळ 1 कोटी67 लाखांचे शेअर्स केवळ 47 सभासदांच्या नावावर दाखवले. ही लूट आहे.लवकरच स्फोट होईल.