बाबासाहेबांचं समजावरचं ऋण हे पुढच्या अनेक पिढ्या विसरू शकणार नाही – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

9

पुणे : आज महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुणे स्टेशन येथे आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.   बाबासाहेबांचं समजावरच ऋण हे पुढच्या अनेक पिढ्या विसरू शकणार नाहीत. दलित समाजावर  झालेल्या अन्यायाविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. त्यांना न्याय  मिळवून दिला. दलित समाज हा शिकला पाहिजे, त्यांनी संघर्ष केला पाहिजे, आणि त्यांचं प्रबोधन झालं पाहिजे. अशा प्रकारचा आग्रह धरण्याच्या बरोबरीने या देशाची घटना त्यांनी लिहिली, असे चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या कार्याची आठवण करून देत पाटील म्हणाले कि, आंबडकरांनी घटना मंडळी ती  जगातली सगळ्यात चांगली  घटना मानली  जाते. देशाला स्वातंत्र्य मिळून आज ७५ वर्ष झाली तरी ती घटना बदलावी  लागली नाही, पण जेव्हा जेव्हा पेच निर्माण झाला तेव्हा त्याच उत्तर त्या घटनेतच सापडलं. पुढचे हजार वर्ष काय झालं तर काय करावं याच लिखाण, याच चिंतन म्हणजे घटना आहे.

बाबासाहेबांच्या घटनेचे वैशिष्ट्य असे कि, ज्यात सगळ्याच माणसांना एकमताचा अधिकार आहे. जगात महिलांना मताचा अधिकार मिळण्यासाठी मोर्चे काढावे लागले. पण भारत हा एकमेव देश असा आहे कि, ज्यामध्ये पुरुषांनाही एकमत आणि महिलांनाही एकमत आहे. सगळ्यांना आपला राज्यकर्ता मिळवण्याचा अधिकार आहे. बाबासाहेबांच्या घटनेमध्ये पहिल्यांदा असे  झाले कि राजा हा मतपेटीतून जन्माला आला त्यामुळे कोणीही  माझ्या सारखा गिरणी कामगाराचा मुलगा थेट राज्याचा मंत्री होऊ शकतो. तो गिरणी कामगाराचा मुलगा आहे म्हणून त्याला नाकारलं जात नाही. त्यामुळे दलित समाजानेच ऋण मानले पाहिजे असे नाही तर संपूर्ण भारताने त्यांचे ऋण मानले पाहिजे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.