पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मावळ तालुक्यातील चांदखेड येथील बारमुख क्रिकेट स्टेडियमचं उदघाटन

मावळ : आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मावळ तालुक्यातील चांदखेड येथील बारमुख क्रिकेट स्टेडियमचं उद्वघाटन केलं. चंद्रकांत पाटील आज क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी करताना दिसले. त्यांच्या या खेळामुळे खेळाडूंना प्रोत्साहन मिळाले.

क्रिकेट स्टेडियमचे उदघाटन करताना त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. ते म्हणाले कि, मावळ तालुक्यातील स्टेडियममुळे या भागातील खेळाडूंची सोय झाली आहे. याशिवाय वेळसे पवनानगर येथील क्रिकेट स्टेडियमचा प्रस्ताव लवकरच मार्गी लावण्यात येणार आहे. इनडोअर आणि आऊटडोअर खेळासाठी आणखी स्टेडियम उभारावे यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी ग्वाही चंद्रकांत पाटील यांनी दिली.
यावेळी माजी मंत्री बाळा भेगडे, माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, पंचायत समिती सदस्य दत्तात्रय माळी, सरपंच मीना माळी आदी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!