पुण्यात आता कापडी पिशव्यांचे ATM …  या कापडी पिशव्यांमधून गरजू महिलांसाठी रोजगार निर्मिती होणार – माधुरी मिसाळ

14

पुणे : बाजारातून वस्तू विकत घेताना कापडी पिशव्यांचा सर्रास वापर केला जातो. या पिशव्यांमुळे पर्यावरणावर गंभीर असा परिणाम होतो. यावर एक उत्तम उपाय म्हणून पुण्यात आता कापडी पिशव्यांचे ATM  बसवण्यात येत आहे. आमदार माधुरी मिसाळ यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे.

पुणे महानगरपालिकेला झेन्सार-आर.पी.जी. फाउंडेशनच्या संस्थेच्या वतीने ८ कापडी पिशव्यांचे ATM मशीन्स आणि प्लास्टित डिस्पोजल मशीन भेट म्हणून देण्यात आले असून या मशिन्समधून पुणेकरांना पर्वावरणपूरक कापडी पिशव्या सहज उपलब्ध होणार आहेत. यावेळी आमदार माधुरी मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. या कापडी पिशव्यांमधून गरजू महिलांसाठी रोजगार निर्मिती होणार असल्याचे मिसाळ यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.

पर्यावरण जपण्यासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त कापडी पिशव्यांचा वापर करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी अशी ATM मशीन्स महत्त्वाचा टप्पा ठरतील. पुणे शहरातील विविध भागात तसेच पर्वती मतदारसंघातील मार्केट यार्ड येथे प्रायोगित तत्त्वावर या मशीन्स बसवण्यात येत असून एका महिन्याच्या कालावधीत उपयोगिता तपासून इतर भागात या मशीन्स उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, उद्यान अधिक्षक अशोक घोरपडे आणि डॉ. सौ. केतकी घाटगे उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.