भारती विद्यापीठाने विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रोत्साहन द्यावे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

पुणे : भारती विद्यापीठाच्या २८ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयसिंगराव पवार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शांतीलाल मुथा यांना जीवन साधना पुरस्काराने सन्मानित केले.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले कि, स्वर्गीय पतंगराव कदम यांनी १९६६ साली सुरु केलेल्या संस्थेला १९९३ साली अभिमत नावाचा दर्जा प्राप्त झाला. आजचा हा दिवस स्थापना दिन म्हणून साजरा करण्याबरोबरच ,ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये भरपूर काम केलं , एक विषय मिशन म्हणून जगले अशा लोकांचा सत्कार करण्याचे ठरविले असल्याचे पाटील म्हणाले.
दोंन्ही मान्यवरांनी आपापल्या क्षेत्रात अपार काम केले आहे. शालेय शिक्षणामध्ये नैतिक शिक्षणं कसं आलं पाहिजे , त्याचं प्रॅक्टिकल कस असल पाहिजे ज्यामधून विद्यार्थी लवकरात लवकर ते कस शिकेल यावर भर दिला पाहिजे. याचा मुथाजी खूप प्रयोग करत असतात , ते प्रयोग सिद्ध करत असतात. हजारो शाळांमध्ये ते पोहचवण्याचा प्रयत्न करत असतात . मागील १५ वर्षांपासून ते हे करत असल्याचे पाटील यांनी सांगितले. कोविडच्या काळातही त्यांची आरोग्य यंत्रणा खूप उपयोगी आली.
देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात केंद्र सरकारने आणलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने भावना यावेळी व्यक्त केल्या. नवीन शैक्षणिक धोरणानुसार माणसाचे व्यक्तिमत्त्व घडविण्यासोबत संशोधनावर विशेष भर देण्यात येत आहे. त्यामुळे विद्यापीठानेही विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन केले.
या कार्यक्रमाला अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष अभय जेरे, ज्येष्ठ लेखक डॉ. जयसिंगराव पवार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शांतीलाल मुथा, कुलपती शिवाजीराव कदम, प्र-कुलगुरु डॉ. विश्वजीत कदम, कार्याध्यक्ष आनंदराव जाधव, कुलगुरू डॉ. विवेक सावजी, कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप, रजिस्टार जी. जयकुमार यांच्यासह इतर मान्यवर आणि विद्यार्थी उपस्थित होते.