बालेवाडीतील मोझे महाविद्यालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने विद्यार्थिनींसाठी ‘इन्सिनरेटर मशीन’ची सुविधा उपलब्ध

6

पुणे : बालेवाडी येथील मोझे अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या आरोग्य आणि स्वच्छतेसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून महाविद्यालयात सॅनिटरी वेस्टच्या सुरक्षित आणि शास्त्रोक्त निपटाऱ्यासाठी ‘इन्सिनरेटर मशीन’ बसवण्यात आले असून, त्याचे लोकार्पण सोमवारी यशस्वीरित्या पार पडले.

या उपक्रमाचे नेटके नियोजन सौ. स्मृती जैन यांनी केले होते. या प्रसंगी सचिन पाषाणकर, नगरसेविका रोहिणीताई चिमटे, लहूअण्णा बालवडकर, गणेश कळमकार, मोरेश्वर बालवडकर, अस्मिताताई करंदीकर, मृणाल गायकवाड आणि जागृती विचारे यांसारखे मान्यवर उपस्थित होते.

महाविद्यालयात सॅनिटरी वेस्टच्या सुरक्षित आणि शास्त्रोक्त निपटाऱ्यासाठी ‘इन्सिनरेटर मशीन’ बसवण्यात आले असून, या माध्यमातून स्वच्छतेचा एक नवा दर्जा प्रस्थापित होईल असा मला विश्वास असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

महाविद्यालयाचे प्राचार्य रत्नाराज कुमार जांबी, प्राध्यापिका सीमा शिएकर आणि सर्व शिक्षक व विद्यार्थिनींनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. हे समाधान आम्हास अधिक कार्य करण्याची प्रेरणा देते. महिलांचे आरोग्य आणि शिक्षण हे आमच्या प्राधान्यक्रमावर असून, अशा सोयी-सुविधा राज्यभर पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे देखील पाटील यांनी म्हटले.

Get real time updates directly on you device, subscribe now.