आयुष्यावर बोलू काही’ या एव्हरग्रीन कार्यक्रमाने सदैव रसिक श्रोत्यांचे असेच मनोरंजन करावे – चंद्रकांत पाटील

पुणे : संदिप खरे आणि सलील कुलकर्णी यांच्या ‘आयुष्यावर बोलू काही’ या कार्यक्रमाला २० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने त्यांच्या २० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सोमवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला.
चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, ‘आयुष्यावर बोलू काही’ या संदिप खरे आणि सलील कुलकर्णी यांच्या कार्यक्रमाला २० वर्ष पूर्ण झाली. आजच्या धकाधकीच्या जीवनात येणारा क्षीण या समधूर मैफलीमुळे क्षणार्धात नाहीसा होतो. आज २० वर्षानंतरही या कार्यक्रमाला होणारी गर्दी एव्हरग्रीन आहे. जी पहिल्या प्रयोगाच्या दिवशी होती. आज २० व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचा योग आला असल्याचे पाटील यांनी सांगितले.
संदीप आणि सलील या जोडगोळीने सादर केलेल्या आपल्या हलक्याफुलक्या विनोदाने आणि सुमधूर गाण्यांनी रसिक श्रोत्यांसह चंद्रकांत पाटील यांनी आनंद लुटला. काव्य-सूरांची ही मैफल आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवते. या जोडगोळीने ‘आयुष्यावर बोलू काही’ एव्हरग्रीन कार्यक्रमाने सदैव रसिक श्रोत्यांचे असेच मनोरंजन करावे, यासाठी पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.