नचिकेत कुलकर्णी यांच्या निधनामुळे कोथरूडवर शोककळा; मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

12

पुणे : कोथरूडमधील भारतीय जनता पार्टीचे सोशल मीडिया पदाधिकारी आणि निष्ठावान कार्यकर्ते नचिकेत कुलकर्णी यांचे नुकतेच अकाली निधन झाले. नचिकेत कुलकर्णी हे कोथरूडमधील चंद्रकांत पाटील यांचे स्नेही आणि विद्यार्थी परिषदेपासूनचे जुने कार्यकर्ते अनिल कुलकर्णी (एपीके) यांचे चिरंजीव होते. मंत्री चंद्रकांत पाटील यांना हि बातमी समजताच अनिल कुलकर्णी यांच्या घरी जाऊन त्यांचा सुपुत्र तथा भाजपाचा समर्पित कार्यकर्ता नचिकेत कुलकर्णी याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

नचिकेतचे अकाली जाणे अत्यंत वेदनादायी असून, ही हानी केवळ कुलकर्णी कुटुंबियांची नाही तर कोथरूडमधील भाजपाच्या संपूर्ण युवा कार्यकर्त्यांची आहे. त्याच्या जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला असल्याची भावना पाटील यांनी व्यक्त केली. या कठीण प्रसंगी कुलकर्णी कुटुंबियांच्या दुःखात मी व भाजपा परिवार पूर्णतः सहभागी आहोत. नचिकेतच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी प्रार्थना यावेळी पाटील यांनी केली.

आपल्या कामाप्रती अत्यंत निष्ठा असलेल्या नचिकेत यांनी भाजपा सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाची बाजू समर्थपणे मांडण्याचे काम केले होते. नचिकेत कुलकर्णी यांच्या निधनामुळे कोथरूडमधील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.