मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती आणि सुविधा देण्यासाठी शासन सकारात्मक – चंद्रकांत पाटील
मुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक काल पार पडली, या बैठकीमध्ये छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था ( सारथी ) कडून प्रशिक्षण घेऊन एमपीएससी आणि यूपीएससीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी गठित केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीकडून अभिनंदन करण्यात आले. ” सारथी संस्थेच्या १०३ गुणवंत विद्यार्थ्यांची MPSC मध्ये निवड झाली. सारथी संस्थेने प्रायोजित केलेल्या एकूण ३९ विद्यार्थ्यांपैकी १७ विद्यार्थ्यांची UPSC च्या अंतिम यादीत निवड झाली आहे. ही अभिमानाची बाब आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती आणि सुविधा देण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे मंत्रिमंडळ उपसमितीची अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखेपाटील, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष, माजी आमदार नरेंद्र आण्णासाहेब पाटील ,उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश मोहिते, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (सारथी) व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे उपस्थित होते.