पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यालयात पत्रकार मित्रांची घेतली सदिच्छा भेट

6
अमरावती : अमरावती प्रवासादरम्यान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यालयात पत्रकार मित्रांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी श्रमिक पत्रकार संघटनेचे पदाधिकारी तसेच पत्रकार बांधवांशी संवाद साधला.
श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष गोपाल हरणे यांनी पालकमंत्री श्री. पाटील यांना शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे पाटील, मनपा स्थायी समितीचे माजी सभापती तुषार भारतीय, पत्रकार संघाचे मार्गदर्शक विलास मराठे, उपाध्यक्ष अमोल इंगोले, कोषाध्यक्ष तथा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य गिरीश शेरेकर, सचिव रवींद्र लाखोडे, कार्यकारिणी सदस्य कृष्णा लोखंडे, प्रवीण कपिले आदी सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.