आगामी काळात भारतीय जनता पक्षाला असंच घवघवीत यश मिळत राहण्यासाठी कार्यकर्त्यांनी देखील कठोर परिश्रम घेतले पाहिजेत – चंद्रकांत पाटील

5

पुणे :  भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांच्या वतीने आज पुण्यात सस्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून संवाद साधला. आज भाजपा विधानसभा निवडणुकीत मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यात भाजपने विजयाचे तोरण बांधले आहे. यानिमित्त चंद्रकांत पाटील यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या तीन राज्यातील घवघवीत यशाबद्दल सस्नेह मेळाव्यात सर्वांचे अभिनंदन केले. माननीय मोदीजींवर संपूर्ण देशाचा दृढ विश्वास आहे. आजही देशातला लोकप्रिय नेता म्हणून मोदीजींकडेच लोकांचा कल आहे. त्यामुळे आगामी काळात भारतीय जनता पक्षाला असंच घवघवीत यश मिळत राहण्यासाठी कार्यकर्त्यांनी देखील कठोर परिश्रम घेतले पाहिजेत, असे आवाहन यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.