‘गाव चलो अभियानांतर्गत आज चंद्रकांत पाटील यांनी नाणेगावमधील ‘वॉल पेंटिंग’ मोहिमेत सक्रिय सहभागी होऊन भाजपाचे कमळ चिन्ह रेखाटले

4

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डाजी यांच्या सूचनेनुसार ‘गाव चलो अभियान’ संपूर्ण देशभरात राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नाणेगावमधील ‘वॉल पेंटिंग’ मोहिमेत सक्रिय सहभागी होऊन भाजपाचे कमळ चिन्ह रेखाटले.

चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटले कि, पक्षाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या ‘वॉल पेंटिंग’ मोहिमेमुळे माझ्या महाविद्यालयीन जीवनातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम करतांनाच्या आठवणी जागृत झाल्या. यावेळी ‘अबकी बार ४०० पार’ अशा घोषणा देऊन पुन्हा मोदीजीच पंतप्रधान होतील अशी भावना यावेळी उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.