कसब्यातील तापकीर गल्ली येथे अद्ययावत सोईसुविधांनी युक्त अशा अभ्यासिकेचे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण
पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील आपल्या मतदारसंघात अत्याधुनिक सोयी सुविधा पुरवत असतात. लोकांच्या सेवेसाठी ते सदैव तत्पर असतात. फिरते वाचनालय असो वा फिरता दवाखाना या सारख्या अनेक सोयी सुविधा चंद्रकांत पाटील यांनी मोफत उपलब्ध केल्या आहेत. यातच लोकसहभागातून त्यांनी कसब्यातील तापकीर गल्ली येथे अद्ययावत सोईसुविधांनी युक्त अशी अभ्यासिका साकारली आहे. या अभ्यासिकेचे लोकार्पण चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले.
चंद्रकांत पाटील म्हणाले कि, संपूर्ण राज्यातून पुणे शहरात अनेक तरुण एम.पी.एस.सी., यु.पी.एस.सी. या स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी येत असल्याने त्यांना अभ्यासिकेची आवश्यकता असते. यासाठी देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेने अभ्यासिका उभारण्याचा संकल्प केला होता. त्यांना लोकसहभागातून मदत करुन कसब्यातील तापकीर गल्ली येथे अद्ययावत सोईसुविधांनी युक्त अशी अभ्यासिका साकारली असून, त्याचे लोकार्पण पाटील यांनी केले.
यावेळी भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर, हेमंत रासने, संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कुलकर्णी, कार्याध्यक्ष जयंत देशपांडे, मुख्य चिटणीस सुनील पारखी यांच्या सह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.