रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या मराठवाडा उपकेंद्राच्या उभारणीसाठी निधी उपलब्ध करुन देणार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

30

मुंबई : रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या विविध विषयाबाबत मंत्रालयात बुधवारी आढावा बैठक पार पडली. या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या मराठवाडा उपकेंद्राच्या उभारणीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे या बैठकीत पाटील यांनी सांगितले.

चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले कि, रसायन तंत्रज्ञान संस्थेचे मराठवाडा येथे सन २०१८ मध्ये उपकेंद्र सुरु करण्यात आले. दरम्यान, सदर उपकेंद्राचे बांधकाम सुरु झाले असून ते पूर्ण करण्याकारीता आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे सदर बैठकीस आश्वस्त केले. तसेच जालना येथील उपकेंद्राच्या पदनिर्मितीस मान्यता आणि मुल्यनिर्धारण अहवालानुसार संस्थेस देय असलेली वेतन अनुदानाची रक्कम देण्यासंदर्भातही सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याची ग्वाही यावेळी पाटील यांनी दिली.

या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उपसचिव अशोक मांडे,तंत्रशिक्षण संचालक डॉ.विनोद मोहितकर व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.