आदरणीय गीता ताई गुंडे यांच्या जीवनप्रवासावरील पुस्तकाचे मुंबईत प्रकाशन; मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती

11

मुंबई : सामाजिक कार्याचा वसा घेऊन चार दशकांहून अधिक काळ अविरत कार्य करणाऱ्या, असंख्य कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शक आदरणीय गीता ताई गुंडे यांच्या जीवनप्रवासावर आधारित पुस्तकाचे सोमवारी मुंबईत प्रकाशन झाले. या प्रकाशन सोहळ्यास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पाटील म्हणाले, गीता ताईंनी आपले संपूर्ण आयुष्य ध्येयवादाने आणि निस्वार्थ भावनेने समाजकार्यासाठी अर्पण केले. राष्ट्र उभारणीत महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी त्यांनी केलेले कष्ट आणि दिलेली दिशा खरोखरच वंदनीय आहे. श्रद्धेय भैयाजी जोशी आणि वंदनीय शांताक्का यांच्या उपस्थितीत झालेला हा सोहळा ताईंच्या तपस्येचा सन्मान करणारा ठरला. हे पुस्तक केवळ एका व्यक्तीचा प्रवास नसून, एका समर्पित जीवनशैलीचा दस्तऐवज आहे. ताईंच्या या कार्याची ऊर्जा आणि आशीर्वाद आम्हा सर्व कार्यकर्त्यांना सदैव प्रेरणा देत राहतील, अशा भावना पाटील यांनी व्यक्त केल्या.

या सोहळ्यास मंत्री आशिष शेलार, मीनाक्षीताई पिशवे, निर्मलाताई आपटे, आमदार पराग अळवणी तसेच भाजपा पदाधिकारी आणि विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.