आगामी काळात मातृभाषेतून शिक्षणासह व्यवहार याला प्राधान्य दिले पाहिजे – चंद्रकांत पाटील
अखिल भारतीय राजभाषा संमेलन, राष्ट्रीय संगोष्ठी आणि हिंदी कार्यशाळेचे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे : जगदम्बी प्रसाद यादव स्मृती प्रतिष्ठान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि आंतरराष्ट्रीय हिंदी परिषदेच्या वतीने आयोजित अखिल भारतीय राजभाषा संमेलन, राष्ट्रीय संगोष्ठी आणि हिंदी कार्यशाळेचे आज पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
याप्रसंगी बोलताना पाटील यांनी आगामी काळात मातृभाषेतून शिक्षणासह व्यवहार याला प्राधान्य दिले पाहिजे. राज्य सरकारनेही आपले व्यवहार मातृभाषेत सुरू केले आहेत. सर्वांनीही मातृभाषेतून व्यवहारास प्राधान्य देण्याचे आवाहन उपस्थितांना केले.
यावेळी भारत सरकारचे हिंदी सल्लागार समितीचे सदस्य विरेंद्र कुमार यादव, विद्यापीठाचे प्र कुलगुरू प्रा. डॉ. संजीव सोनावणे, महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे अध्यक्ष मोहन जोशी, प्रसिद्ध साहित्यिक दामोदर खडसे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील हिंदी विभागाचे अध्यक्ष प्रा. डॉ. विजयकुमार रोडे जगदम्बी प्रसाद यादव स्मृती प्रतिष्ठानचे सरचिटणीस डॉ. अंशुमाल यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.