राज्यस्तरीय राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी अधिवेशनाचे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी अधिवेशनाचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. राष्ट्रीय सेवा योजनेत 5 लाख 13 हजार विद्यार्थी सहभागी झाले असून आणखी 1 लाख विद्यार्थी वाढविण्याचा प्रयत्न आहे अशी माहिती देण्यात आली. NSS च्या विद्यार्थ्यांनी इतर सर्व विद्यार्थ्यांना जी-20 बैठकांचे महत्व समजवून सांगावे, अशी सूचना यावेळी चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केली.

 

 

यावेळी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कुलगुरु डॉ. कारभारी काळे, भारत सरकारचे शालेय शिक्षण विभागाचे सचिव संजय कुमार, राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे संचालक रजनीश कुमार, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे सहसंचालक प्रा. श्रीधर श्रीवास्तव, जी-२० शैक्षणिक कार्यगटाचे विशेष कार्य अधिकारी चैतन्य प्रसाद, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर, राष्ट्रीय सेवा योजना राज्य सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे, योजनेचे राज्य जनसंपर्क अधिकारी डॉ. रामेश्वर कोठावळे आदी उपस्थित होते.